(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुर शहरातील सर्व कोविड हॉस्पीटल मधील भर्ती झालेल्या रुग्णाच्या बिलाची तपासणी प्रशासना कडून रोजच्या रोज झाली पाहिजे व त्यात त्यांनी किती पी. पी. ई. कीट रोज प्रत्येक रुग्णासाठी वापरले याचा हिशोब सुद्धा त्या हॉस्पिटल च्या डॉक्टर कडून घ्यावयास पाहिजे.
बाजारात चांगली पी पी ई कीट 450-500 रुपयाला मिळत असताना सुद्धा हॉस्पिटल मध्ये 1200 ते 1400 रुपये बिलात लावण्यात आलेले आहे याची सुद्धा प्रशासनाने चौकशी करावयास पाहिजे अन्यथा चंद्रपूर शहर आम आदमी पार्टी या विरुद्ध आंदोलन करेल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
सामान्य जनतेला न्याय मिळवून देने हे आमच्या पक्षाचे नीति धोरण व आद्य कर्तव्य आहे.
ज्या CT scan च्या डॉक्टरांनी प्रशासनाने दिनांक 24/09/2020 च्या पारित केलेल्या आदेशा प्रमाणे ज्यांचा कडून 5000 ते 8000 रुपये CTScan साठी रुग्णा कडून घेतलेले आहेत त्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे पैसे घेवुन रुग्णा कडून घेतलेले CTScan चे जास्तीचे घेतलेले रुपये तत्काल त्या रुग्णाला फोन किवा मोबाइल वर बोलून परत करण्यात यावे. अन्यथा या सर्व बाबीवर आप पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी.
ॲड. राजेश विराणी
महानगर अध्यक्ष,
आम आदमी पार्टी,
चंद्रपूर