अवैध दारू साठयासह 13 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त.

Bhairav Diwase
2 आरोपींना अटक : मुख्य आरोपी अजूनही मोकाट.
Bhairav Diwase. Non 24, 2020
वरोरा:- तालुक्यातील खांबाला येथे अवैध रित्या दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी वरोरा पोलिसांनी बोपापुर शेतशिवरात धाड टाकून 13 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक मोबाईल दोन दुचाकी वाहना 122 पेट्या देशी दारूसाठ्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. जिल्ह्यात काही दिवसापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सह पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. अश्यातच वरोरा पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्यावर सोपविण्यात आला. तत्कालीन ठाणेदार उमेश पाटील यांच्या बदलीनंतर काही जुने व नवीन दारू तस्कर मोठ्या प्रमाणात तालुक्यात सक्रिय झाल्याचे काहीसे चित्र दिसत आहे.वरोर्यात गल्लीबोळ्यात लहान मुले दारू विक्रीसाठी तयार केलेले आहेत.रात्रीच्या वेळेस बिना नंबर प्लेटच्या दुचाकी वाहनावरून हे दारू तस्कर राजरोसपणे दारु तस्करी शहरात मोठ्या प्रमाणात करत असतात. पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्यासाठी या नवीन दारू तस्करांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. याचाच फायदा काही दारू तस्कर घेत आहे. सोमवारी खांबाडा परिसरातील बोपापूर शेत शिवारात दारू तस्करी होत असल्याच्या गुप्त माहिती आधारे वरोरा उपविभागीय पोलिस पथक व वरोरा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री धाड टाकून १२२ पेटी देशी दारू साठ्यासह 13 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला .खांबाडा बारव्हा रोडवरील निर्जन स्थळी हा दारूसाठा लपवून ठेवण्यात आला होता. या अवैद्य दारूची रखवाली करण्यासाठी हे दोन माणसे ठेवण्यात आली होती. याच ठिकाणावरून वरोरा, शेगाव भटाळा,चंदनखेडा , भद्रावती या ठिकाणी अवैध दारू पुरवली जाते. या अवैध धंद्यात मागील दोन दिवसापासून गटबाजी निर्माण झाली असून खांबाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे पोलिसांनी आपले धाडसत्र सुरू करत या अवैध व्यवसायावर लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये शेखर जंगोनी वय 49 वर्ष व शेख रिजवान शेख रसूल राहणार खांबाला या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र या दारू तस्करीतील मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दारू साठा टिपी मार्गाने आणल्या गेल्याची चर्चा आहे. ही कोणत्या पद्धतीने मिळवली गेली. ति कोणाच्या लायसन्स वर उतरवली होती याचाही शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधाराला अटक करून तालुक्यात होत असलेली अवैध दारू तस्करी थांबविण्याचे आव्हान नवनियुक्त पोलीस अधीक्षकांकडे आहे.
वरोरा पोलीस या मुख्य दारू तस्करावर काय कारवाही करणार की मुख्य आरोपी पडद्या आडच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.