बल्लारपूर शहरात महाविकास आघाडीच्या विरोधात वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आंदोलन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 24, 2020

बल्लारपूर:- दि.23/11/2020 ला महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात तसेच माजी वन विकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंहजी चंदेल, नगराध्यक्ष हरीशजी शर्मा व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वामध्ये बल्लारपूर शहरात महाविकास आघाडीच्या विरोधात वाढीव वीज बिल निषेधार्थ आंदोलन घेण्यात आले नगरपरिषद ते तहसील कार्यालयापर्यंत पैदल मोर्चा काढून तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष राजू भैय्या दारी,अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष जुम्मन रिजवी, कामगार आघाडी प्रदेश महासचिव अजयजी दुबे, ज्येष्ठ नेते निलेश खरबडे, समीर केने,नगरसेवक एलय्याजी दासरफ, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशालीताई जोशी, कांताताई ठोके, वर्षाताई सुंचूवार, नगर सेविका पूजा ताई रहीकवार, नगरसेविका सुवर्णाताई भटारकर, आरतीताई आक्केवार, सतीश कणकम, संजय बाजपेयी,करीम भाई, घनश्‍याम बुरडकर,प्रतीक बारसागडे, उदय तांड्रा, शाहजी,देवा वाटकर,आदित्य शिंगाडे, पियूष मेश्राम, मनीष पोडशेट्टीवार त्याचबरोबर असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन संपन्न झाले.