(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा जिवती तालुका तर्फे महाविकास आघाडी सरकारचा जिवती येथे जाहीर निषेध करण्यात आला.
यामध्ये लॉक डाऊन काळातील नागरिकांना पाठवण्यात आलेले विज बिल माफ करण्यात यावे, संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, घरकुला चा तात्काळ निधी देण्यात यावा आदी मागन्या निषेध मोर्चा च्या माध्यमातून करण्यात आल्या.
यावेळी विज बिलाची होळी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
यावेळी जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेशजी देवकते,जिल्हा उपाध्यक्ष केशवराव गिरमाजी, जिल्हा संयोजक सुरेशजी केंद्रे, महामंत्री दत्ताजी राठोड,उपसरपंच तुकाराम वारलावाड, भाजपा नेते प्रल्हाद मदने, गोपीनाथ चव्हाण,पुंडलिक गिरमाजी,सुभाष पवार,नामदेव सलगर, विजय गोतावळे, संतोष जाधव, बालाजी जाधव,बालाजी भुते,भारत चव्हाण ,राजेश राठोड, उत्तम चव्हाण,श्रीदास राठोड,पंढरी वाघमारे, मोडिन पठाण,मानमंत वारे,अनिल कांशीराम राठोड,विनायक राठोड,विश्वनाथ राठोड,नागोराव कवडगावे, माने,लक्ष्मण शिंदे,राजकुमार सुरणर, देविदास आडे,मोतीराम शेखडे, बिरादार जी,आदी उपस्थित होते.