लॉकडाऊन दरम्‍यानची गोरगरीबांची विज बिले माफ करा.

Bhairav Diwase
गडचांदूर येथे भाजपाकडून वीज बिलाची होळी करून केले आंदोलन.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
 कोरपना:- देश्यात, राज्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन दरम्‍यान कुणालाही घराबाहेर पडू नका असे शासन प्रशासनाने आवाहन केले. व जनतेनी ते पाळले त्यावेळी हातावर आणून पोट भरणारे गोरगरीब मजुराला केंद्र शासनाकडून बरेचशी मदत केली परन्तु महाराष्ट्र सरकार नि कुठलीही मदत केली नाही.तेव्हा भारतीय जनता पार्टी कडून आंदोलन करून किमान तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करण्याकरिता आंदोलन केले.त्यावेळेस महाराष्ट्र सरकार चे ऊर्जा मंत्री यांनी मागील लॉकडाऊन
काळातील तीन महिन्याचे विद्युत बिल १०० युनिट पर्यंतचे माफ करण्याची भाषा केली व आता अभ्यास केला असून कुठलेही वीज बिल सरकार माफ करू शकत नाही.""आपल बिल आपली जबाबदारी"" असे बोलून जनतेची थट्टा करीत आहे जनतेची दिशाभूल करीत आहे.
म्हणून आज दि २३/११/२०२० रोजी परत भाजपा कडून गोरगरीबाचे विद्युत बिल माफ करण्या करीता प्रत्येक तालुक्याचे ठिकाणाहून वीज बिलाची होळी करण्यात आली त्याच प्रमाणे गडचांदूरात सुद्धा भाजपा कडून बसस्टॊप परिसरात वीज बिलाची होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला व राज्याचे मुख्यमंत्री ,तथा ऊर्जा मंत्री यांना गडचांदूर पोलीस निरीक्षक यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.याप्रसंगी निलेश ताजने,अरविंद डोहे,सौ विजयालक्ष्मी डोहे, सौ ऍड दिपांजली मंथनवार, सौ सपना सेलोकर,सौ रंजना मडावी,प्रा. मेहताब सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र सरकार हे तीन तिघाडी असून यांनी दिलेले वीज बिल माफ करण्याचे शब्द पाळले नाही अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत गोरगरीबाचे कोरोना काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ होणार नाही तो पर्यंत आम्ही सातत्याने लढा देउ. असा निर्धार यावेळी करण्यात आला. सदर आंदोलन गडचांदूर शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार,यांच्या नेतृत्वात भाजपा नेते निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात हरीश घोरे गडचांदूर महामंत्री संदीप शेरकी,कृष्णा भागवत ,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,महेशजी शर्मा,मेहताब सर,सौ विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष,सौ रंजना मडावी,ऍड दीपांजली मंथनवार,सौ सपना सेलोकर,संगीता गोरडवार शंकर आपुरकर,अशोक दरेकर,अरविंद कोरे कुणाल पारखी अभिषेक जोगी बबलू रासेकर,शेख इम्रान,योगेंद्र केवट,सौ त्रिवेना जगताप, भाजपा पदाधिकारी तथा शहरातील महिला पुरुष उपस्थित होते.