आरोग्य शिबिराकडे भं. तळोधी वासीयांनी फिरवली पाठ.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिंपरी:- दि 21/11/2020 ला भं. तळोधी येथील जि. प. प्राथ. शाळेत आरोग्य विभाग गोंडपिपरी तथा प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली होती‌.                                            

         भं.तळोधी या गावात कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच गावातील कोरोना बाधित रुग्ण दगावत असल्याच्या निकर्षाने गावात कोरोना विषाणूच्या बाबतीत जणजागृती आणी कोरोना चाचणी अहवाल घेण्याकरीता आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत केला होता.
       शिबिरात दहा व्यक्तींची चाचणी करण्यात आली त्यामध्ये दोन व्यक्ती कोरोना पाँझिटीव आढळुन आले. गावातील लोकसंख्येच्या तुलनेत शिबिराला पाहिजे तसा प्रतिसाद जनतेकडुन मिळाला नाही. तसा शिबिराला गावातील काही लोकांचा विरोध देखिल होता. परिणामी आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी लागली. गावातील बहुतांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. परंतु चाचणी करुन घेण्याकरिता तयार नसल्याने बाधितांची नावे समोर येत नाही आहे.असे आरोग्य कर्मचार्यांचे मणने आहे.                                                                    
            स्थानिक शासकिय आयूष रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ. अतकरी यांचे कडुन अधिक माहिती जाणुन घेतली असता. गावात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असुन आत्तापर्यंत विस व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे अहवाला दरम्यान समोर आले आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात लोकांचा अज्ञान व गैरसमज त्याच प्रमाणे शासन स्तरावरील नियमांची पायमल्ली करणे आयोजित आरोग्य तपासणीला प्रतिसाद न देने यामुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराला वाव मिळतो. असे मत व्यक्त केले.