आरोपीवर गुन्हा दाखल.
भद्रावती:- प्रकृती ठीक करून देण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडली याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनारायण अम्बिका प्रसाद वाजपेयी वय 68 राहणार दरबान सोसायटी भद्रावती असे आरोपीचे नाव आहे सूमठाणा येथील 32 वर्षीय युवतीची प्रकृती ठीक नसल्याने ती खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली तिला कोव्हीड निघाल्याने दरबान सोसायटी येथीलच एक इसम उपचार करतो अशी माहिती मिळाली. उपचारासाठी त्या इसमाकडे गेली असता त्याने पहिल्या दिवशी तिला मालिश करण्याचा सल्ला दिला व दुसऱ्या दिवशी अंगावरील वस्त्र काढून तिचे वर अत्याचार केला या घटनेची माहिती पीडित युवतीने आपल्या वडिलांजवळ सांगितली युवतीच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार सुनील सिंह पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.