ओबीसींच्या जनगणनेच्या लढ्यात युवकांनी पुढाकार घेण्याची गरज:- डॉ.ऍड. अंजली साळवे विटनकर.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी जात प्रवर्ग दर्शविणारा रकाना असावा. तरच ओबीसी समाज येत्या जनगणनेत सहभागी होईल. ओबीसी जनगणना व्हावी या अनुषंगाने 26 नव्हेंबर 2019
  
  ओबीसी का एलान पाटी लगाओ अभियान सुरू केले आहे. या साठी आपण न्यायालयीन लढा दिला आहे. ओबीसी चा लढा तीव्र करण्याची गरज आहे व यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे . असे प्रतिपादन डॉ.ऍड. अंजली साळवे विटनकर यांनी राजुरा येथे केले.
              
    राजुरा तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने राजुरा येथील धनोजे कुणबी सभागृहात रविवारी ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सभा पार पडली.
                                 या प्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना डॉ. ऍड.अंजली साळवे विटनकर बोलत होत्या. या प्रसंगी ऍड. अंजली साळवे म्हणाल्या ओबीसींच्या हक्काचा लढा एकत्रित येऊन लढणे गरजेचे आहे . ओबीसी समाजाच्या राजकीय नेते , पक्ष कार्यकर्ते व ओबीसी समाजांनी आपसातले मतभेद, मनभेद बाजूला सारून ओबीसीच्या जनगणनेचा लढा निर्धाराने लढण्याची गरज आहे. भारतीय संविधान आपल्या बाजूने आहे. 340 कलम आपल्या साक्षीला आहे . सामान्य माणसाला याचे महत्व पटवून देणे आश्यक आहे. युवा पिढीने यात सहभाग घेऊन एकत्रित येऊन हा लढा तीव्र करण्याची नितांत गरज आहे असेही त्यांनी सांगितले. या वेळी ऍड पुरुषोत्तम सातपुते सौ. कुंदा जेणेकर, दिनेश पारखी , संभाजी साळवे यांनी आपल्या मनोगतातून समाज बांधवांना मार्गदर्शन केले. 
                                  विविध सामाजिक क्षेत्रातुन युवकानी ओबीसी साठी लढ़ा उभारण्याकरीता ओबीसी समन्वय समिति मध्ये नियुक्ति करण्यात आली.
                                     यावेळी संतोष देरकर,साईनाथ परसुटकर,सुभाष अडवे, विवेक खुटेमाटे, चापले सर,उमेश पारखी,केतन जुंनघरे,ओबीसी समन्वय समिती राजुरा चे अध्यक्ष उत्पल गोरे, महासचिव सूरज गव्हाणे ,उपाध्यक्ष विशाल शेंडे, प्रदिप बोबडे,सुजित कावळे,स्वप्निल शेरकी,सूरज भामरे,रितिक बुटले , निलेश बोंसुले,प्रणव बोबडे,मनोज बोढेकर,कवडु नागोसे,प्रविण चौधरी,वैभव गालफड़े,प्रतिक कावळे,करण झाडे,प्रज्वल ढवस,यश मोरे,संकेत पारखी,अमोल ढोले,अतुल चोथले,अंकित पारखी,अमोल काकडे इत्यादी समन्वयक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन जुनघरे यांनी केले. संचालन गायत्री उरकुडे यांनी केले तर आभार प्रणव बोबडे यांनी मानले.