कुरखेडा उपजिल्हा रूग्नालयाची ठप्प पडलेली शस्त्रक्रीयेची सूविधा पूर्ववत सूरू करा:- पदाधिकारी व गावकर्यांची मागणी

Bhairav Diwase
Bhairav Diwase.      Nov 09, 2020 
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपजिल्हा रूग्नालयात प्रसूती शस्त्रक्रीया तसेच अन्य लहान मोठ्या शस्त्रक्रीया बंद असल्याने रूग्नाना मोठा मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे. तातळीने कार्यवाही करीत आवश्यक बाबीची पूर्तता करावी व येथे शस्त्रक्रीयेची सूविधा पूर्ववत सूरू करण्यात यावी अशी मागणी येथील पदाधिकारी व गावकर्यानि केली आहे.

        येथील उपजिल्हा रूग्नालयात पूर्वी प्रसूती शस्त्रक्रीयेसह अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रीया नियमित होत होत्या. शस्त्रक्रीया करीता सर्जन,प्रसूती तज्ञ यांचा सह सूगंनी तज्ञ डाक्टरची गरज असते. मात्र मागील दिड महिण्यापूर्वी येथील सूगंनी तज्ञ असलेले डॉ संभाजी ठाकर यांची येथून बदली करण्यात आल्याने सूगंनी तज्ञ अभावी येथील शस्त्रक्रीया चे कामे ठप्प पडलेली आहे .शस्त्रक्रीया आवश्यक असलेल्या पेशंट ना गडचिरोली रेफर करण्यात येत असल्याने त्याना मोठा आर्थीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नियमित स्त्रिरोगतज्ञ, भुलतज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिसियन व सर्जन ह्या पाचही तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या असतांना सर्व सेवा रुग्णाला मिळणे अपेक्षित आहे. परंतु बधीरीकरणतज्ञाला ईतरत्र प्रतिनियुक्तीवर पाठविल्याने गरोधर मातांना मात्र सिझरसाठी गडचिरोलीला रेफर व्हावं लागत आहे. एके काळी मनुष्यबळाअभावी सेवा मीळत नव्हत्या आणि आता उपलब्द मनुष्यबळाचा असा गैरउपयोग होतो आहे. येथे कार्यरत डॉ ठाकर यांची बदली रद्द करीत व अन्य उपाय योजणा करीत ठप्प पडलेली शस्त्रक्रीयेची सूविधा पूर्ववत सूरू करावी अशी मागणी परिवर्तन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी जि प सदस्य सूरेंन्द्रसिंह चंदेल, जि प सदस्य प्रल्हाद कराडे ,नगरसेवक पूंडलिक देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ महेन्द्र कुमार मोहबंसी, कांग्रेस ता अध्यक्ष जयंत हरडे, राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष अयूब खान, माजी आरोग्य सभापति आशाताई तूलावी, रोहित ढवळे व पदाधिकारी व गावकर्यानि केली आहे.