(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शिवसेना राजूराच्या वतीने तालुक्यात इनकमिंग चालूच असल्याच चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूभीवर तालुक्यातील भुरकुंडा(मोठा) येथील विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि शिवसेना शाखेचे उदघाट्न करण्यात आले.
जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या आदेशाने माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात गावातील तमुस चे कांग्रेस चे अध्यक्ष श्री. प्रफुल नथ्थुजी मादासवार यांनी शिवसेना प्रवेश घेवुन यांना शाखा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली. तसेच उपशाखा प्रमुख कवडु मारोती निकोडे, सचिन कोटनाके, इस्तारी लेनगुरे, कवडु निखोडे, हर्षल कोटरंगे, गनेश सुर्तेकर, रमेश सेनुर्ले, गनेष ढोले, प्रमोद शेंडे, किशोर सुरपाम, यांसह कांग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, संघटना, पक्षाला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी, नगरसेवक राजुभाऊ डोहे, बाळुभाऊ कु़ईटे, निलेशभाऊ गम्पावार, गणेश चोथले, रमेश झाडे उपतालुका प्रमुख, बंटी मालेकर ऊपतालुका प्रमु़ख, समीर शेख, गोपाल शिंदे मनोज कुरवटकर पांचगाव शाखाप्रमुख, नयन खाडे अहेरी शाखाप्रमुख,आकाश बकाने आणि समस्त भुरकुंडा( मोठा)गावकरी उपस्थित होते,