नागेश ईटेकर यांची युवा स्वाभिमानी पक्षाच्या गोंडपीपरी तालुकाअध्यक्षपदी निवड.

Bhairav Diwase
सुरज ठाकरे यांचा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- नागेश इटेकर यांचा राजकीय कालावधी बऱ्याच वर्षापासून असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रथमतः विद्यार्थ्यांचे तालुका अध्यक्ष तर युवकचे शहर अध्यक्ष पदावर राहून काम केले. पक्ष अंतर्गत झालेल्या वादा मुळे त्यांनी
नूकतेच शेतकरी संघटना मध्ये सुध्दा काम केले. त्या नंतर.भारतीय जनता पक्षा त प्रवेश घेतला पण याही पक्षात अंतर्गत कलह व वाद -विवादामुळे त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाही त्यामुळे त्यांनी युवा तडफदार तथा कामगाराचे नेते, युवा स्वाभिमान चे चंद्रपूरजिल्हा अध्यक्ष सूरज भाऊ ठाकरे यांच्या कार्यप्रनाली वर विश्वास ठेवून युवा स्वाभीमानी पक्षात प्रवेश केला. नागेश भाऊ ईटेकर यांची सुरज भाऊ ठाकरे यांनी थेट युवा स्वाभिमानी पक्षाच्या गोंडपीपरी तालुका अध्यक्ष पदी निवड करुन गोंडपीपरी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या वर सोपवली.

नागेश ईटेकर यांचा तालुक्यात चांगलाच जनसंपर्क असून युवा वर्ग निश्चितच त्यांच्याशी जोडला जाणार आहे. असे असताना त्यांच्या गतकाळाची माहिती घेतली असता त्यांनी तालुक्यात पक्ष वाढी करीता खूप मेहनत केली.
कठोर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, तथा महीलाच्या समस्या जातीने लक्ष्य घालून सोडविण्यास भर दील कोणत्याही समस्या असोत त्यांचा निफटारा करण्यात ते कधीच हयगय केली नाही.
ते गरीब व दलित कुटुंबातील असून पक्ष वाढीसाठी कठोर मेहनत घेतल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेली कामगिरी बघून त्यांची युवा स्वाभीमानी पक्षाच्या गोंडपीपरी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली .