(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तळागाळातील समस्या दूर करण्यासाठी व त्यांना वाचा फोडून शासन दरबारी सर्वसामान्यांच्या समस्या मांडणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्याची समाजात ओळख आहे.तो म्हणजे पत्रकार हा आहे. मग अश्या कुठल्याही पत्रकार व्यक्तीवर अन्याय व अत्याचार होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ तालुका सिंदेवाहीची नवनिर्माण नवनियुक्त पदाधिकारी यांची कार्यकारणी दि.०८/११/२०२० ला गठित करण्यात आली.
कार्यकारणी ही पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकर साहेब यांनी संघाची भूमिका व ध्येय, उद्देश यांवर प्रकाश टाकला. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना आपल्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करुन सर्वांना सन्मानित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून भगवंत पोपटे, तालुका उपाध्यक्ष मिथुन मेश्राम, तालुका कार्याध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका सचिव प्रशांत गेडाम, तालुका सहसचिव सुनिल गेडाम, तालुका कोषाध्यक्ष अमान कुरेशी, तालुका संपर्क प्रमुख अमोल निनावे, तालुका संघटक भुवन बोरकर, तालुका सहसंघटक जितेंद्र नागदेवते, तालुका प्रसिद्धी प्रमुख कुणाल उंदिरवाडे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित रुपेश निमसरकर जिल्हा प्रतिनिधी दै आत्ताच एक्सप्रेस, अमोल भडके दै.आत्ताच एक्सप्रेस प्रतिनिधी व नवनियुक्त पदाधिकारी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवंत पोपटे, संचालन आक्रोश खोब्रागडे व आभार प्रदर्शन कुणाल उंदिरवाडे यांनी केले.