जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारे कार्यकर्ते हे भाजपाचे शक्‍तीस्‍थळ:-: आ. सुधीर मुनगंटीवार

Bhairav Diwase
लालपेठ कॉलरी परिसरातील 300 कार्यकर्त्‍यांचा भाजपात प्रवेश.
Bhairav Diwase. Nov 11, 2020
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी ही जनसेवकांची पार्टी आहे. जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारे कार्यकर्ते हे भाजपाचे शक्‍तीस्‍थळ आहे. आज ज्‍यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे त्‍यांच्‍यावर पक्षाची ध्‍येय धोरणे जनमानसापर्यंत पोहचविण्‍याची जबाबदारी आलेली आहे. पक्षाचा पंचा हे केवळ कापड नसून ती जबाबदारीची जाणीव आहे. कोरोना काळात भारतीय जनता पार्टीच्‍या कार्यकर्त्‍यांनी ज्‍या तळमळीने सेवाकार्य केले ते अन्‍य कोणीही केले नाही. अद्याप कोरोनावर औषध न आल्‍याने सुरक्षीत अंतर राखत जनतेची सेवा भाजपाचे कार्यकर्ते करतीलच. शारिरीक अंतर राखणे जरी गरजेचे असले तरीही मनाने जवळ राहत परस्‍परांना मदत करण्‍याचे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 10 नोव्‍हेंबर रोजी भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे लालपेठ कॉलरी परिसरात 300 कार्यकर्त्‍यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्‍याने प्रवेशित कार्यकर्त्‍यांना आ. मुनगंटीवार यांनी पक्षप्रवेशाबाबत शुभेच्‍छा दिल्‍या. भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपा गटनेता वसंत देशमुख, नगरसेविका कल्‍पना बगुलकर, श्‍याम कनकम, ज्‍योती गेडाम, प्रदीप किरमे, सतीश घोनमोडे, संदीप आगलावे, राजकुमार आक्‍कापेल्‍लीवार, सुरज सरदम, मधु श्रीवास्‍तव, रामलु भंडारी, राजू कामपेल्‍ली, कुणाल गुंडावार, गणेश गेडाम, दशरथ सोनकुसरे, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, राजेश कोमल्‍ला, अमोल नगराळे, राजेश यादव, वंदना राधापरवार, भानेश मातंगी, पवन ढवळे, दौलत नगराळे, सुभाष ढवस आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. नव्‍याने प्रवेशित या कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुन लालपेठ कॉलरी परिसरात पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्‍यावर आपला भर राहील, असे डॉ. मंगेश गुलवाडे प्रास्‍ताविकता बोलताना म्‍हणाले.

यावेळी प्रामुख्‍याने श्रीनिवास मरीवार, नरायन चिंतल, कार्तीक खंडे, सर्ली ताल्‍लापेल्‍ली, रवी जाडी, श्रीनिवास कामपेल्‍ली, सुरज बोल्‍लम, राजू भंडारी, भुदेवी कोडाम, नागुबाई कुंभारे, रीता रामटेके, मंगा कामपेल्‍ली, लक्ष्‍मी सरदम, भारती मत्‍तेवार, दुर्गा झाडे, अंजली देवनुर यांनी त्‍यांच्‍या समर्थकांसह भाजपात प्रवेश घेतला.