श्री लक्ष्मण कवडू पोटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश.

Bhairav Diwase
मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व मा. देवरावदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दि. 21/11 ला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रा) देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा तालुक्यात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महीला आघाडी यांच्या तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमन मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.76 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला श्री देवराव दादा यांनी भेट दिली. 
 
         यावेळी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व मा. देवरावदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत लालहेटी (घोसरी ) ता. पोंभुर्णा येथील श्री लक्ष्मण कवडू पोटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पं. स सभापती तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, पं. स सदस्य विनोद देशमुख, नगरसेवक अजित मंगळगिरीवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय मस्के, महामंत्री अमोल मोरे, घोसरी चे युवा मोर्चा शाखा अध्यक्ष सुधीर वडपल्लीवार, लालहेटी येथील भाजपा चे जेष्ठ नेते श्री चरणदास पाल, युवा मोर्चा उपाध्यक्ष नैलेश चिंचोलकर भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.