उमेदचे मानले आभार....... चांदा ते बांदा अंतर्गत शेळीपालन योजनेच्या संधीचे केले सोने.

Bhairav Diwase
उमेद अभियानातील लोणारे कुटुंबियानी शेळीपालनाची फुलविली बाग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवांनोन्नती अभियान (उमेद)तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोम्भूर्णा अंतर्गत वेळवा गावातील जीजा सतीश लोनारे ह्या अंजलि स्व. सहायता समुहाच्या सदस्य आहेत. सन २०१९ -२० या आर्थिक वर्षात चांदा ते बांदा अंतर्गत शेळीपालन १०+१ योजनेचा लाभ घेतला. उमेद अभियानाच्या दशासूत्रिमधिल १० व्या सुत्राला गवसनी घालत शाश्वत उपजीविका म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु केला त्यावेडेस या कुटुंबाकडे सुरवातीला १० शेड्या व १ बोकड मिळाले होते. सुरवातीला शेड्यांचे व्यवस्थापन ही खुप मोठी समस्या त्यांचेपुढ़े उभी होती. परंतु शेडीपालन करण्याची मनातील जिद्ध त्यांच्या कुटुंबात इतकी ओतपोत भरली होती की त्यांनी यश प्राप्त केल्याशिवाय मागे फिरून बघितलेच नाही. आजच्या घडीला त्यांचे कड़े १० मोठे नग शेड्या व १४ लहान पीलू असे पशुधन आहे.


           पुढिल सहा महिन्यात लोणारे कुटुंबियास या व्यवसायातून कीमान एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची आशा वर्तविली आहे. हे सर्व करीत असताना उमेद अभियानातील घोसरी-चिंतलधाबा प्रभागातील समुदाय पशु व्यवस्थापक किशोर माहोरकर, पशुसखी दर्शना गोवर्धने, यांनी वेळोवेळी केलेले लसीकरण, जंतुनाशक, गोठा व्यवस्थापण, पानी स्टेंड, चारा स्टैंड, यावर केलेले उचित मार्गदर्शन खुप मोलाचे ठरले. आज लोनारे कुटुंबात सक्षम आर्थिक परिस्थिती मुळे जे आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्या करीता जीजा लोणारे व सतीश लोणारे यानी उमेद चे तालुका व्यवस्थापक मा. राजेश दूधे सर, प्रभागाचे सी.सी.अहीरकर सर, सी. एल. एफ. मैनेजर विमालताई वाकुड़कर यांचे आभार मानले.