घुग्घुस पोलिसांनी सापळा रचून केली अटक.
चंद्रपूर:- कुख्यात दारु तस्कर आरोपी जतिन राऊत व विशाल अड्डूर दोघेही रा. घुग्घुस यांना आज २४ नोव्हेंबर रोजी घुग्घुस परिसरातुन सकाळी गुप्त माहिती आधारे घुग्घुस पोलिसांनी सापळारचुन अटक केली.
काही दिवसांपूर्वीच वर्धानदीच्या पुलाजवळील बेलोरा एसएसटी पाईंटवर यंग चांदा ब्रिगेडचे नेते विलास वनकर यांनी कार्यकर्त्यासह दारु तस्करी रोखण्यासाठी पहाटे ५:३० वाजता दरम्यान पाळत ठेवली होती दरम्यान नवीन दुचाकीवरून आरोपी जतिन राऊत व विशाल अड्डूर हे तब्बल २८ पेटी देशी दारुची तस्करी करीत वणी तालुक्यातुन घुग्घुस येथे येत होते परंतु यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना बघून दुचाकी व २८ पेटी देशी दारु तिथेच ठेऊन पळ काढला होता.
घुग्घुस पोलिसांनी २८ पेटी देशी दारु एकुण किंमत २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन फरार अद्यात आरोपी विरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच घुग्घुस येथील कुख्यात दारू तस्कर जतिन राऊत व विशाल अड्डुर हे फरार झाले होते.
घुग्घुस परिसरातुन सापळारचुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
बातमी संकलन:- पंकज रामटेके