Bhairav Diwase. Nov 24, 2020
चंद्रपूर:- राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहून ९ वी ते १२ वीच्या जिल्ह्यातील ३५८ शाळा सोमवारपासून सुरु करण्यात आल्या आहेत. टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत ९ वी ते १२ वी चे वर्ग, वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचना व निर्देश प्राप्त झाल्यावर प्रशासनाने या निर्देशांच्या अधिन राहुन चंद्रपुर जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेल्या शाळा व महाविद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यात करण्यास परवानगी दिली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, हात धुण्यासाठी साबन व पाणी आदींची सुविधा असणे आवश्यक करण्यात आली असून शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दररोज करणे आवश्यक राहील असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान सोमवारी ९ वी ते १२ वी च्या जिल्ह्यातील ३५८ शाळा सोमवारपासून सुरु करण्यात आल्या असून यावेळी तब्बल ८ हजार ५७३ विद्यार्थांनी हजेरी लावली. ३ हजार ५८० शिक्षक सोमवारी शाळेत हजर होते.