रेती तस्करीत शेती उपयोगी ट्रालीचा वापर; चंद्रपूर परिवहन अधिका-यांचे दुर्लक्ष.
चंद्रपूर:- मंगळवारला सायंकाळी ६ वाजता दरम्यान नकोडा रेती घाटांवरुन ट्रँक्टर क्र.एम एच ३४ एपी ९५०८ व एम एच ३४ एपी १५०७ हे दोन ट्रँक्टर घुग्घुस कडे अवैध रेती भरुन येत असतांना नकोडा घुग्घुस रस्त्यावर घुग्घुस पोलिसांनी कारवाई करून जप्त केले.
आरोपी मालक इम्तियाज रशीद अहमद (४५) व शहंशाह रशीद अहमद (४८) रा. घुग्घुस व चालक मनोज शंकर राय (३१) व मंगेश शंभर नागरकर (३१) रा. घुग्घुस यांचे वर कलम ३७९ (३४) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
२ ब्रास रेती किंमत १० हजार व वाहन किंमत १० लाख रुपये असा एकुण १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील दहा दिवसापासून नकोडा रेती घाटांवरुन घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी धुमाकूळ घालीत रेती तस्करी ट्रँक्टर ट्रालीने सुरु केली आहे. हजारो ब्रास रेती दररोज चोरीस जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे परंतु महसुल विभाग गाढ झोपेत आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती तस्करीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दिवसरात्र रेती तस्करी तलाठी कार्यालय व पोलीस स्टेशन कार्यालया समोरुनच सुरु असते त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणाली वरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
घुग्घुस येथील महसुल विभागाच्या तलाठी व मंडल अधिकारी यांची तडका फडकी बदली करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
रेती तस्करीत क्रुषी उपयोगाच्या ट्रँक्टरच्या ट्रालीचा वापर करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेली एक ट्राली विना क्रमांकाची आहे त्यामुळे चंद्रपूर परिवहन अधिकारी यांनी ही घुग्घुस परिसरातील ट्रँक्टर धारकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हि कारवाई पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे सहा.फौ.गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, रंजित भुरसे, निलेश तुमसरे, सचिन डोहे, प्रकाश करमे, मनोज धकाते, नितीन मराठे यांनी केली आहे.