पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शेतकरी कुटूबातील अतुल अनिल गव्हारे पिएचडी (PHD) देशात आठवा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खूर्द येथील अत्यंत हलाखीची परिस्थिती व शेतकरी कुटूबातील अतुल अनिल गव्हारे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारे आयोजित अखिल भारतीय कृषी प्रवेश परीक्षा मध्ये कृषी अर्थशास्त्र या विषयात भारतातून 8 वा व ओबीसी तून 5 वा क्रमांक मिळवुन कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती साठी पात्र ठरला. याअगोदर एमएससी (कृषी अर्थशास्त्र) चे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथून त्याच परीक्षेद्वारे भारतातून 9 वा क्रमांक व शिष्यवृत्ती मिळून 2019 ला पूर्ण केले. phd साठी एकूण 14000 हजार विद्यार्थी बसले होते.

अतुलच्या या कामगिरीने पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतुलचया या कामगिरीबद्दल सर्व माध्यमातून शुभेच्छाचा त्याच्यावर वर्षाव होत आहे. पंचायत समिती उपसभापती सौ. ज्योतीताई परशुराम बुरांडे यांनी अतुला संपर्क साधून शुभेच्छा दिल्या.