(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस आसमवार चामोर्शा
चामोर्शी:- गरीबाचा व शेतकर्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे अधिकार व्हावा त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने "महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय गणपुर (रै)" तर्फे विविध अधिकारी व मार्गदर्शक वर्गाकडून मार्गदर्शन केले गेले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यामध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाचे मार्गदर्शक विठ्ठलराव चौथाले सर इंदिरा गांधी महाविद्यालय येनापुर तसेच "शोध अभिरूचीचा" या पुस्तकाचे सुप्रसिद्ध लेखक, मनमपल्लीवार सर 'आयएएस अकॅडमी अमरावती जिल्हा गडचिरोली यांचे समन्वयक', पी.जे. सातार साहेब 'माजी गट विकास अधिकारी', कडुकर सर, यांनी स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच वाचनालयाला काही पुस्तके आणि आर्थिक मदत देण्यात आली.
स्पर्धा परीक्षा चे संपूर्ण देशात बाजारीकरण झाले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला ह्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता यावे यासाठी परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द व चिकाटी तसेच सातत्य राखून स्पर्धा परीक्षेचा गड पार करता येईल.शिवाय या अभ्यासातून केवळ अधिकारीच नव्हे तर एक सर्वागीण विकास झालेला एक जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन चौथाले सर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजी पाटील परसोडे 'पंचायत समिती सदस्य चामोर्शी' प्रमुख पाहुणे सुधाकर पाटील गद्दे 'ग्रामपंचायत माजी सरपंच', कडूकर सर लोकमान्य टिळक विद्यालय, दुर्गे सर लोकमान्य टिळक विद्यालय, प्रकाशजी पाटील भोयर 'सामाजिक कार्यकर्ते', साईनाथजी हजारे, अनिल राऊत सर रयत शिक्षण संस्था, शालिकजी चिताळे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वैभव बुरमवार यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकारी प्रशांत एस मेकलवार अध्यक्ष, वैभव एस बुरमवार उपाध्यक्ष/ सचिव, सदस्य जगदीश ओझलवार, नितेश धदरे, जीवनदास भोयर, लीलाधर खरबनकार,देवेंद्र चिताडे, अंकुष गद्दे, अजय राऊत, सचिन वेलादी, पवन सोनटक्के, आशिष चिताडे, जय राऊत, सुमित भंडारी यांनी सहकार्य केले.