गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन च्या मागणीला यश: दिवाळीच्या सुट्ट्या मंजूर.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:-
गोंडवाना विद्यापीठाद्वारे शैक्षणिक सत्र 2020-21 या सत्रामध्ये शैक्षणिक दिनदर्शिकेत दिवाळीच्या सुट्ट्या नमूद कराव्या यासाठी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर ने मागणी केली होती त्यांच्या मागणीचा विचार करून गोंडवाना विद्यापीठाने दिवाळीच्या 10 दिवसाच्या सुट्ट्या मंजूर केलेल्या असून गोंडवाना विद्यापीठाने आजच तात्काळ परिपत्रक काढले आहे.

                नागपूर,अमरावती आणि नांदेड येथील विद्यापीठांनी त्यांच्या शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या नमूद केलेल्या आहेत मात्र गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये दिवाळी सुट्ट्यांची नोंद नाही ही बाब गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर असोसिएशनच्या शिष्ट मंडळाने  कुलगुरूंना प्रत्यक्ष भेटून  दिलेल्या निवेदनातून निदर्शनात आणली होती. गोंडवाना विद्यापीठातील सर्व प्राध्यापक वर्गाची मागणी लक्षात घेता संघटनेने हा प्रश्न लावून धरला होता. आज झालेल्या विद्या परिषद सभेमध्ये संघटनेच्या मागणीची दखल घेण्यात आली असून   प्राध्यापकांसाठी दिवाळीच्या सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या प्राप्त  यशाबाबत  गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यंग टीचर  असोसिएशनचे आभार मानले आहे.