राजूरा येथे गांजा तस्करांचा पर्दाफाश; 10 लाखाचा जवळपास गांजा जप्त.

Bhairav Diwase

चार आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा

राजुरा:- स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा शहरात मोठी कार्यवाही करत 8 लाख 30 हजार 220 रुपये किमतीचा 69 किलो 185 ग्रॅम गांजा जप्त केला असून चार आरोपीना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार राजुरा शहरातील शिवाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होणार आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पथकाने केली.

   शिवाजीनगर येथे सतीश मुंडी तेलजीरवार यांच्या संदर्भात पोलिसांनी विचारपूस केली असता तो दुसरीकडे किरायाने राहायला गेला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी करत घराची झडती घेतली असता झडतीच्या कार्यवाहीत गाद्या खाली गांजा लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. गांजाचे वजन हे 69 किलो 185 ग्रॅम असून त्याची किंमत ८ लाख ३० हजार २२० रुपये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी नामे सतीश मुंडी उर्फ मोंडी तेलजीलवार वय २२ रा. सोंडो, मुक्काम राजुरा, सुनील दादाजी मडावी ३८ संत गाडगे बाबा नगर गडचांदूर, नजीरशाह शहेनशहा वय ४५, मेश्राम ले आऊट, जयश्री नगर गडचांदूर, पुरुषोत्तम किष्टय्या जंजीरला वय ५७ धोपटाला, ता. राजुरा या चार आरोपीना ताब्यात घेत त्यांना पोलीस स्टेशन राजुरा येथे आणण्यात आले. आरोपीकडून ८ लाख ३० हजार २२० रुपये रुपयाचा गांजा, गुन्ह्यात वापरलेली कार क्र. एमएच ३४ के २१०१, तीन मोबाईल असा एकूण १० लाख ४१ हजार २२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनि संदीप कापडे, सफौ पद्माकर भोयर, नितीन जाधव, राजेंद्र खनके, पंडित वऱ्हाडे, पोहवा राजकुमार देशपांडे, नापोशी मिलिंद चौहान, जमीर पठाण, अलुप डांगे, सुरेंद्र महोतो, मनोज रामटेके, नितेश महात्मे, शेखर आसुटकर, पोशी जावेद सिद्दीकी, नितीन रायपुरे यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.