आदर्श शाळेत संत गाडगेबाबा पुण्यतिथि साजरी.

Bhairav Diwase

राष्ट्रीय हरित सेना व स्कॉऊट-गाईड विभागातर्फे स्वच्छता अभियान संपन्न.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा

राजुरा:- बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या स्कॉऊट-गाईड व आदर्श हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा पुण्यतिथि कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, स्कॉऊट-गाईड यूनिट च्या सुनीता कोरडे ,वैशाली टिपले ,कब -बुलबुल यूनिट च्या अर्चना मारोटकर आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती.

       

         यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरीत्रावर उपस्थित मान्यवारान्नी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवीन्यात आले.

    

        गाडगेबाबा वैद्यानीक द्रुष्टीकोन असलेले प्रसिध्द समाजसुधारक होते. दिनदलित आणि पिडीतांच्या सेवेमधे आपल संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सूधारका मधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दाभिकपणा रुढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देतांना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. ते एक चालती -बोलती पाठशाळाच होती. त्यांच्या पुण्यतिथि निमित्त शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी गोळा केलेला कचरा नगर परिषद राजुरा च्या सफाई कामगारांच्या स्वाधीन करण्यात आला.