जय डेबूजी जय गोपाला तर्फे विरुर (स्टेशन) येथे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- जय डेबूजी जय गोपाला विरुर (स्टेशन) तालुका राजुरा येथे वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
        
         गाडगेबाबा वैद्यानीक द्रुष्टीकोन असलेले प्रसिध्द समाजसुधारक होते. दिनदलित आणि पिडीतांच्या सेवेमधे आपल संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सूधारका मधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दाभिकपणा रुढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देतांना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. ते एक चालती -बोलती पाठशाळाच होती. त्यांच्या पुण्यतिथि निमित्त जय डेबूजी जय गोपाला यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी विरुर येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते.