युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी मागितली अवैध धंदे सुरू करण्याची परवानगी तेही थेट गृहमंत्री व चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये कोंबडा बाजार भरविण्यात येतो त्यामुळे त्या ठिकाणी जुगार, दारू, सट्टा पट्टी, हे देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सूरज ठाकरे यांनी या विरोधात येलगार पुकारला असून, अनेक निवेदने तथा मोर्चा च्या माध्यमातुन या व इतर मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेध न्यायचे प्रयत्न केले.
परंतु पोलिस विभागातील काही ठाणेदाराचे विशेषता राजूरा व गडचांदूर आणि कोरपना, यानी तर जणू अवैध धंद्यांना रान मोकळे करून दिले आहे त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री, कोंबडा बाजार, जुगार, सट्टा सुरू आहे.
म्हणूनच की काय, सूरज ठाकरे यांनी थेट गृह मंत्री यांनाच अवैध धंदे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मागून वेगलीची शक्कल लढवून सर्वांचे लक्ष वेधले आहे व अश्या प्रकारच्या निवेदनाने शासनाची देखील तारांबळ उडाली असून गृह विभागाने तात्काळ या विषयक अहवाल पोलिस अधीक्षक चंद्रपूर याना मागितला आहे. अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे,आता प्रशासन ठाकरेंच्या या परवानगीसाठी आलेल्या निवेदनाचे काय करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.