(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना सुद्धा योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दारू ची उलाढाल होताना दिसत आहे. रोज लाखों रुपयाची दारू चंद्रपूर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून पार्सल होत आहे. मात्र याकडे पूर्णपणे पोलीस प्रशाशनाचे दुर्लक्ष्य आढळून येत आहे. आज अशीच ऐक गुप्त माहिती नुसार समुद्रपूर (वर्धा ) जिल्हा येथील स्कॉर्पिओ गाडी हि चिमूर सिंदेवाही मार्गाने येत असल्याची खबर मिळाली असता लगेच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी /त्यांची टीम पाठलाग करून गाडीतील मुद्देमाल तसेच पेट्या जप्त करून एकूण गाडी मध्ये 50 पेट्या सापडल्या असून अंदाजी किंमत पाच लाख रूपये तसेच स्कॉर्पिओ गाडी (MH-31 CS 4449 ) दहा लाख रूपे असा एकूण मुद्देमाल सहित 15 लाख रुपयाची दारू पकडण्यात आली. मात्र आरोपी हे गाडी सोडून पळून गेले. हि मोहीम यशस्वी करण्या करीता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक श्री सोनवाने सर, मंगेश मातेरे, सतीश निनावे,शरद सावसाकडे, यशवन्त ठोंबरे, सुभाष मेडीवार (होमगार्ड), तसेच त्यांच्या चमूने उपस्थित राहून यशश्वी पार पाडली. पो. नि. घारे सर यांच्या मार्गदर्शना खाली पो. उप. निरीक्षक श्री सोनवाने सर , पुढील तपास करीत आहेत.