बल्लारपूर पोलिसांनी एकूण 6 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी जिल्ह्यातून केले हद्दपार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.     Dec 02, 2020
बल्लारपूर:- पोलीस ठाणे हद्दीतील दुखापतीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून 2 वर्षाकारिता हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये श्रीराम वॉर्डातील 32 वर्षीय मंगेश बावणे, सुभाष वॉर्ड येथील 20 वर्षीय राहुल बहुरीया, टिळक वॉर्ड किशन सूर्यवंशी, आंबेडकर वार्ड येथील अनवर शेख सहित दोघांना चंद्रपूर जिल्हा पोलोस अधीक्षक साळवे यांच्या आदेशाने 4 जणांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सण 1951 चे कलम 55 अनव्ये 2 वर्षाकारिता हद्दपारीची कारवाई केली आहे .