शिवसेनेच्या अवैध मोबाइल टाँवर बद्दल झालेल्या आंदोलनाला यश.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- दिनांक १ डिसेंबर रोजी नेहरू नगर येथे एका घरावर अवैध रित्या टावर चे बांधकाम करण्यात आले होते. त्या बद्दल स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध असतांना सुद्धा कुठलीही परवानगी न घेता एका नरेंद्र नगराळे नामक घर मालकाने नजीकच्या जागी बी एस एन ल चे मोबाइल टावर बांधकाम केलेले होते. स्थानिकांनी वारंवार तक्रारी देऊनही महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नसतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख प्रमोद भाऊ यांच्या नेतृत्वाखाली, युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे, उपशहर प्रमुख सुरेश नायर, श्रीकांत करडभाजने, विजुभाऊ ठाकरे, महिला आघाडीच्या विद्याताई ठाकरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेहरू नगरच्या स्थानीक नागरीकांसोबत तिथेच त्या घरासमोर धरने आंदोलन पुकारण्यात आले. या टाँवर मुळे भविष्यात होणार्या आरोग्य विषयक समस्या, जीवीतहानी या बद्दल माहिती फोन वरून महानगर प्रमुख यांनी महानगर उपायुक्त यांना दिली असता या आंदोलनाची दखल घेत अतिक्रमण विभाकाचे अधिकारी व त्यांची संपुर्ण यंत्रणा येऊन ते बांधकाम थांबविण्यात आले व पुढील कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी स्थानिकांना दिली.यावेळी,कामगार सेनेचे प्रफुल्ल चोबेजी,बंटी कमटम, वैभव,पंकज दरोई, जावेद पठाण, सुयोग नगराळे, महेंद्र पेटकर, आनंद शेंडे, गोलु शास्त्रकार, सुशांत घोरमोड़े, सिंगा बडबाल, नितेश लोहकरे, स्थानीक चोबे ताई, भावना पाटील, अल्का शास्त्रकार, माया पुसम, ममता दत्त, कुंता जुनघरे, दुर्गा साळुंखे, वंदना साळुंखे, साधना बुरडकर, प्रियंका पेटकर, सविता पेटकर, सिताबाई गजर, लिना पेटकर, माला चक्रवर्ती, बबली पारोही, मुळे बाई, आदिंची उपस्थिती होती.