डॉ. शितल आमटे आत्महत्या प्रकरण.

Bhairav Diwase
लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी.
Bhairav Diwase. Dec 02, 2020
वरोरा:- कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डाॅ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या होऊन २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी पोलिसांच्या हाती अद्याप कुठलाही ठोस पुरावा लागला नाही. 

           पोलीस यंत्रणा या घटनेचा उलगडा करण्यात व्यस्त आहे. दरम्यान डाॅ. शीतल आमटे यांच्या आनंदवनातील कार्यालयातील लॅपटाॅप, २ मोबाईल, संगणक यासह औषधी व रिकाम्या सिरीन हेसाहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले आहे.