मयत कोरोना योद्धयांच्या वारसांना 10 दिवसात नोकरी द्या.
Bhairav Diwase. Dec 21, 2020
महाराष्ट्र:- सरकारी अधिकारी व कर्मचारी कोविडच्या काळात मैदानात उतरून जीवाची पर्वा न करता, अनेक कोरोना योद्ध्यांनी आपला जीव गमावला, कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपामध्ये 10 दिवसात नोकरी द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री टोपे साहेबांना केलेली होती. अजूनही कोणताही निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजपावेतो घेतलेला नाही.
कोरोना संकटात लढण्याऱ्या कोरोना योध्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल हे महाविकास आघाडी सरकार अजिबात गंभीर नाही, या संदर्भात आता नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात समस्त कोरोनाच्या या संकटात आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायहक्कासाठी विधानभवनात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार कडाडले.
या संकट काळात समाजासाठी लढताना ज्यांनी जीव गमावला, त्यांचे कुटुंब अडचणीत आले. अश्या योध्याच्या कुटुंबाबद्दल राज्यसरकारने आता तरी गंभीर होऊन निर्णय घ्यावा याचं अपेक्षाही सुधीरभाऊंनी व्यक्त केल्या.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांना पत्र पाठविण्यासारखे निर्णय घेण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घ्या असा घणाघात आम. सुधीर मुनगंटीवार ह्यांनी केला आहे.