भाजपा युवा मोर्चा तर्फे तहसीलदारांना निवेदन.
कोरपना:- शासनाने प्रत्येक बाजार समिती क्षेत्रातील जिनिंग ला कापूस गाडी खाली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मजुरी न घेण्याबाबत निर्देश दिले आहे. मात्र त्याची सर्रास पायमल्ली होत असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावी लागते आहे.
ही लूट थांबण्यासाठी या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे कोरपना तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यंदा अस्मानी संकटाने आधीच शेतकरी ग्रासला आहे. त्यातच अनेक संकटाचा सामना त्याला करावा लागतो आहे.
कोरपना तालुक्यात कापूस खरेदी होत असलेल्या प्रत्येक जीनिंग वर गाडी खाली करण्यासाठी सर्रास मजुरी घेतली जाते आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या भरडला जातो आहे. या पार्श्वभूमीवर ही लूट तातडीने थांबवावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चा तर्फे देण्यात आला आहे.
याबाबत महाप्रबंधक भारतीय कपास निगम लिमिटेड यांना तहसिलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी भाजपा युवा जिल्हा मोर्चा जिल्हा सचिव ओम पवार, दिनेश सुर, नगरसेवक अमोल आसेकर, दिनेश खडसे, गजानन भोंगळे, नैनेश आत्राम, अभय डोहे, कार्तिक गोनलावार आदी उपस्थित होते.