महापौर संदीप जोशी यांनी आज महापौरपदाचा दिला राजीनामा.
नागपूर:- राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नागपूर महानगरपालिका महापौर संदीप जोशी आज (21 डिसेंबर) महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांचा 13 महिन्यांचा कालावधी आज पूर्ण होत आहे. त्यामुळे ते राजीनामा देत आहे. यानंतर भाजपकडून महापौर पदावर भाजप नेते दया शंकर तिवारी यांना संधी दिली जाईल.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी 13 महिने संदीप जोशी आणि 13 महिने दया शंकर तिवारी महापौर राहतील, असं सूत्र ठरलं होतं.
त्याप्रमाणेच आता भाजपच्या पालिका सत्तेत खांदेपालट होत आहे. महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले.