रक्तदान करून संत गाडगे बाबांना अभिवादन.

चिंतामणीच्या प्राध्यापकांनीही केले रक्तदान.

रक्तदानातून समाजासाठी प्राध्यापकांनी ठेवला आदर्श:- प्राचार्य गुल्हाने.
Bhairav Diwase. Dec 21, 2020


पोंभुर्णा:- महाराष्ट्रातील रक्तपेढयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार स्थानिक चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स, चिंतामणी महाविद्यालय, पोंभूर्णा तसेच चिंतामणी काॅलेज ऑफ सायन्य या तीनही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 21 डिसेंबर रोजी संत गाडगेबावांना अभिवादन करण्याच्या हेतूने रक्तदान शिबीराचे आयोजन केले. 



 महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. टी. एफ. गुल्हाने, प्राचार्य डाॅ. एन. एच. पठाण, प्रभारी प्राचार्य डाॅ. सुधिर हुंगे यांनी संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पुजन करून शिबीराचे उद्घाटन केले. 
         यावेळी प्राचार्य गुल्हाने म्हणाले की कोरोना काळामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती नसतांना देखील सर्व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी रक्तदान करून समाजापुठे आदर्श प्रस्थापित केला आहे. पुढे ते म्हणाले की, समाजातील अन्य वर्गाने देखील यातून बोध घेवून रक्तपेठ्यांमधील रक्ततुटवडा संपुष्टात आणण्यासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांच्या सदर शिबीरासाठी आलेल्या चमुत रक्तकेंद्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर यांच्या समाजसेवा अधिक्षक पंकज पवार, तंत्रज्ञ अपर्णा रामटेके, साबीर शेख, पुनम कोवे, लक्ष्मण नगराळे तथा रूपेश घुम यांचा समावेश होता. 
          



       रक्तदात्यांमध्ये संघपाल नारनवरे, सतिश पीसे, शैलेन्द्र गिरीपुंजे, विठ्ठल चौधरी, ओमप्रकाश सोनोने, नितिन उपर्वट, सुधिर हुंगे, संतोषकुमार शर्मा, बाळासाहेब कल्याणकर, दिलिप विरूटकर, चंद्रकांत वासेकर या प्राध्यापकांसह अजय बोमकंटीवार, पराग बोमकंटीवार हे शिक्षकेतर कर्मचारी व रितीक गोनलवार, विवेक इटेकर, श्रीकांत शेंडे, प्रदिप कोडापे, सावन बासनवार, हर्षल गयके या विद्यार्थी व समाजसेवी युवकांसह अनेकांचा समावेश होता. 
       
        शिबीराचे यशस्वीततेसाठी डाॅ. संघपाल नारनवरे, प्रा. धर्मादास घोडेस्वार, प्रा. नितीन उपर्वट व डाॅ. पाठक या रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांसह समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या