शेवटी घुग्घुस नगरपरिषदची घोषणा.
चंद्रपूर:- घुग्घुस नगरपरिषद व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी मिळून सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समिती स्थापन केली. सर्व पक्षाच्या नेत्यांना निवेदन देत अनेक आंदोलने घुघुस बंद, मुंडण, अर्धनग्न आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्यात आले.
येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक कोणताही पक्ष लढवणार नाही अशी भूमिका घेत सर्व पक्षांनी बहिष्कार टाकला. जोपर्यंत शासन नगरपरिषद करणार नाही तोपर्यंत निवडणूक न लढविण्याचा निर्धार करत कोणीच ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरला नाही.
आंदोलन अधिक तीव्र होत आहेत हे बघून शेवटी शासनाला जाग आली आणि आज ग्रामविकास मंत्रालयाने घुग्घुस नगर परिषद ची घोषणा केली. घुग्घुस नगरपरिषद करण्यासाठी सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समितीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.