Top News

निवडणुक खर्च सादर न केल्याने उमेदवारीवर विर्जन; मनसे नेत्याला झटका.

आवारपुर ग्रामपंचायतीवर काॅग्रेसचा झेंडा फडकणार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- मनसे नेत्याच्या पत्नीने मागील निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने त्यांचा उमेदवारीचा अर्ज झाल्याने मनसेला जोरदार झटका बसला असून शेतकरी संघटनेचे मातब्बर माजी सरपंच यांच्याही पत्नीचा अर्ज मागील निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने रद्द केला आहे तर संघटनेच्या प्रभाग ५ मधील उमेदवार शंकर पेन्देकर यांचाही अर्ज बाद झाला आहे यावेळेस बीजेपी व बीएसपी युती कडून प्रभाग ३ मधून निवडणूक लढविणारे निरजंने याचांही अर्ज बाद झाला आहे मनसे , बीजेपी , बीएसपी , शेतकरी संघटना यांचे अनेक उमेदवारी अर्ज बाद झाल्याने काॅग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आयती संधी मिळाली आहे. 

     खर्च सादर न करणे उमेदवाराला चांगली भारी पडले असून याचा फायदा काॅग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होणार असून आवारपुर ग्रामपंचायतीवर काॅग्रेसचा झंडा फडकणार असल्याची चर्चा आहे.

    काॅग्रेस पक्षाकडून प्रभाग ५ मधून अनुसुचित जाती (स्त्री) राखीव प्रवर्गातून एकमेव उभी असलेली उच्च शिक्षीत इंजिनियर उमेदवार एकता केशव वानखेडे या निर्विरोध निवडणून येणार असल्याचे निश्चित एकता वानखेडेचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने