Top News

घुग्गुस येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52 वी पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम संपन्न.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती.

Bhairav Diwase. Dec 31, 2020


चंद्रपूर:- घुग्गुस येथील श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ श्रीराम वार्ड क्र.2 घुग्गुस यांच्या सहयोगाने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52 वी पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.



     कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, पसं उपसभापती निरक्षण तांड्रा माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसरप, भाजपा नेते श्याम आगदारी, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, शरद गेडाम उपस्थित होते.


    वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उदघाटन महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.


    सकाळी रामधून दिंडी काढण्यात आली भजनाचा कार्यक्रम आणि रमाकांत मांढरे महाराज क्षीरसागर महाराज व जुनारकर महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रध्दांजली देण्यात आली.


    कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, सचिव संजय भोंगळे, नीलकंठ नांदे व मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने