Top News

शेतकरी आत्महत्यांची १० प्रकरणे मदतीसाठी पात्र.

Bhairav Diwase. Dec 31, 2020
चंद्रपुर:- जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. उपजिल्हाधिकारी गव्हाळ यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. बैठकीला पोलीस विभाग, आरोग्य व कृषी विभागाचे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे संबंधीत अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

गावनिहाय पात्र प्रकरणे......
पात्र प्रकरणात नागभीड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त तुळशीराम पाथोडे, राजुरा तालुक्यातील नलफडी येथील अतुल धानोरकर, बोटगाव येथील नितेश ठावरी, येरगव्हाण येथील शत्रुघ्न बावणे, गोवरी येथील अनिल देवाळकर व सुमठाणा येथील प्रमोद मोरे, मूल तालुक्यातील नवेगाव येथील संदिप झाडे, गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील निळकंठ आमने, चेकतळाधी येथील प्रदिप भोयर, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील अशोक डंबारे व चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील सौरभ कुळमेथे यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने