Top News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील सिंगडझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी चा दोन दिवसीय कार्यक्रम पार पडला.ह्या कार्यक्रमात गावात सर्वधर्म समभाव व एकात्मता ही आनंदमय रूची होती. कार्यक्रम हा गावात सकाळी ग्रामस्थांनी गावातील मुख्य मार्गांची ग्रामसफाई करून गावातील मुख्य मार्गाने पालखी फिरविण्यात आली.पालखीमध्ये उत्स्फूर्तपणे बालगोपाल तथा गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.

    त्याचप्रमाणे कार्यक्रमात भजन,रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. नामदेव मेश्राम, जगन्नाथ कवठे, राजू बोळेवार, आनंदराव पोहनकार, चंदू किन्नाके,अर्जुन मेश्राम, सुखदेव मेडीवार, सुधाकर मोहूर्ले ह्या पुरुष मंडळींचं तथा सौ. शिल्पा कवठे, सुनंदा लांजेवार, सरिता मोहूर्ले, शुभांगी किन्नाके,करिश्मा मोहूर्ले,सलोनी रामटेके ह्या महिला व गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने