ताडोबा प्रकल्पालगत भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी.

Bhairav Diwase
अग्रवाल परिवारास जंगल सफारी करणे बेतले जिवावर.

12 वर्षीय मुलगी अपघातात जागीच मृत्यू तर 40 वर्षीय काकाचा नागपूर ला नेताना वाटेत मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- दिनांक. ०१/१२/२०२० ला नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्य विलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुम चा भडगा नाला मध्ये फोर्ड ची एन्डोव्हर कार (MH 49 KB 2489) एस आकाराचे वळण मार्ग असल्याने नव्याने रोडचे काम सुरू असून वाहनवरून नियंत्रण सुटले व कार नाल्यात पलटी मारल्याने मुलगी जागीच मरण पावली व दुसरे तिचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय ४० वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाले.

      तर या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते. या सहा पैकी २ जनांचे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.