बल्लारपुर शहरात रक्तगट तपासणी शिबीर.

Bhairav Diwase
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने यशस्वी आयोजन.
Bhairav Diwase. Dec 20, 2020
बल्लारपुर:- बल्लारपुर शहरात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब यांच्या वतीने स्थानिक महाराणा प्रताप वॉर्ड येथे आरोग्यासंबंधी जनजागृती तथा सतर्कतेचा दृष्टीने पाऊल उचलत क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या प्रमुख उपस्थतीमध्ये रक्तगट तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 
  
         कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जनमानसात निरोगी व तंदुरुस्त आरोग्याविषयी सतर्कता बळावलेली आहे. परंतु असे असले तरी बर्‍याच नागरिकांना स्वतःचे रक्तगट काय आहे? स्वतःला कोणते गुप्त किंवा दीर्घाजाराची व्याधी सुरू झाली आहे? इ. अशा अनेक गोष्टींची माहिती नसते. यासोबतचं आज कोविड -19 या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त आणि प्लाझ्मा दान करण्यात येतो आहे. परंतु यामधेही अनेकजण स्वतःचे रक्तगट कोणते यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अशा महत्त्वाच्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून नेहमी आपल्या नवनवीन लोकोपयोगी कार्यातून समाजसेवेचे कार्य करणार्‍या आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब यांच्या वतीने स्थानिक महाराणा प्रताप वार्डात रक्तगट तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येत सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


यावेळी, नगरसेवक स्वामी रायबरम, भाजपा शहर सचिव संजय बाजपेयी, प्रकाश दोतपेल्ली, राजेश कैथवास, सलीम नबी अहेमद, हरी लंका, सुधाकर सिक्का, आदित्य शिंगाडे, अभिषेक सातोकर यांसह बल्लारपूर भाजयुमोचे कार्यकर्ते तथा वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.