आदिवासी नेते गोदरु पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली अर्पण.
पहांदी पारी कुपार लिंगो समिती कोरपना तालुका चे आयोजन.
कोरपना:- पहांदी पारी कुपार लिंगो उस्तव समिती कोरपना तालुका च्या वतीने गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य गोदरु पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली कार्यक्रम पहांदी पारी कुपार पेनठाणा माथा फाटा येथे आयोजित केला होता.
गोदरु पाटील जुमानके हे गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि गोंडी भाषा मानकिकरन समितीच्या माध्यमातून गोंडीयन चळवळीच नेतृत्व करीत होते. त्यामुळे गोंडीयन चळवळीचे नेतृत्व हरपल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. या वेळी सरपंच अरुण मडावी, सरपंच वसंता मडावी, सरपंच प्रभाकर वेलादी, भारत पा. कन्नाके, संजय सोयाम, लिंगा पा वेट्टी, लक्ष्मन कुळसंगे, नामदेव आत्राम, लक्ष्मन चीकराम, रामदास मेश्राम, बबन कोरांगे, बाबाराव सिडाम, आदिवासी विद्यार्थी संघ जिल्हाध्यक्ष कंठू कोटनाके, राजकुमार मंगाम, संजय मडावी, शालिक मेश्राम, पवन मडावी, गजानन मडावी व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.