Top News

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पोंभुर्णा येथे ठिय्या आंदोलन व विज बिलाची होळी.

तहसीलदार मार्फत उर्जामंत्र्यांना देण्यात आले निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पोंभुर्णा येथे आज दिनांक 7 डिसेंबर ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले चौक पोंभुर्णा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.तसेच कोरोना काळातील वाढिव विज बिलाचा निषेध करुन बिज बिलाची होळी करण्यात आली.
विदर्भाच्या सर्वांगिण विकासासाठी व उद्धारासाठी शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी बेरोजगारांचे भविष्य घडवण्यासाठी स्वतंत्र विदर्भ हा एकच उपाय असुन तो मिळवण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सदर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या ठिय्या आंदोलनात विविध प्रकारच्या मागण्या हि करण्यात आल्या असुन कोरोणा काळातील विज बिल सरकारने भरावे,200 युनिट वीज बिल माफ करावे,शेती पंपाचे विज बिल माफ करावे, लोडशेडींगचं बंद करण्यात यावी , शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,सर्प दंश होऊन मृत्यू झाल्यास त्यांना इतर वन्यप्राण्यांप्रमाणे मदत देण्यात यावी,व विदर्भ राज्य त्वरीत देण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे निवेदन देण्यात आले. या ठिय्या आंदोलनात पोंभुर्णा तालुक्यातील असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले.
स्वतंत्र विदर्भाचा आवाज बुलंद केला.कार्यक्रमातला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गिरिधर सिंग बैस, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा नेते अविनाश कुमार वाळके, आदिवासी नेते अशोक सिडाम, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लुलारामजी खोब्रागडे, शेखर देवगडे,दिनकर वनकर, जगजीवन उराडे, दिवाकर आत्राम,गौतम वनकर,व असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने