Top News

अवैध देशी दारु तस्करीत एकास अटक.

सहा पेटी अवैध देशी दारु जप्त.
Bhairav Diwase. Dec 07, 2020
संग्रहित छायाचित्र:-
चंद्रपूर:- चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील शेनगाव फाट्या जवळ वॅगन आर क्र. एम एच 31 बिसी 111 चारचाकी वाहन सहा पेटी अवैध देशी दारुची तस्करी करीत असतांना गुप्त माहिती आधारे पोलीसांनी सापळा रचुन अटक केली. हि कारवाही 6 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान करण्यात आली.

आरोपी हरदीप सिंग समंदर सिंग टाक (21) रा. जुनोना चौक चंद्रपुर हा वॅगन आर चारचाकी वाहन क्र.एम एच 31 बिसी 111 मध्ये सहा पेटी अवैध देशी दारु चंद्रपुर च्या दिशेने तस्करी करीत असल्याची गुप्त घुग्घुस पोलीसांना मिळताच शेनगाव फाट्या जवळ सापळा रचून अटक केली. सहा पेटी अवैध देशी दारु किंमत 30,000 हजार वाहन किंमत 80,000 हजार असा एकुण 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी हरदीप सिंग समंदर सिंग टाक यास अटक करण्यात आली आहे.

हि कारवाही पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे पथकाचे सचिन बोरकर मनोज धकाते निलेश तुमसरे प्रकाश करमे यांनी केली.

बातमी संकलन:- पंकज रामटेके

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने