युवा स्वाभिमान चे जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.
चंद्रपूर:- युवा स्वाभिमान संघटने तर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चा चे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केले जिल्ह्या त अनेक लहान मोठे उद्योग असून त्यात भूमिहीन झालेल्या ना काम नाही, शेतकऱयांच्या समस्या, तरुणाला काम नाही, वीज बिल पन्नास टक्के कमी करण्यात यावे अश्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मागण्या खालील प्रमाणे
1) शेतकर्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसानभरपाई द्यावी
2) लॉक डाऊन काळातील वीजबिल 50%माफ करावे
3) स्थानिकांना रोजगारा मध्ये प्राधान्य देण्याचे सक्तीने पालन करावे
4) असंगठित कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या
5) अल्ट्राटेक सीमेंट कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या.
6) गोंडपिंपरी येथील पंचायत च्या सफ़ाई कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्यात
7) जिल्ह्यातील खराब रस्ते तत्काल ठीक करावे
इत्यादी मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात तालुका अध्यक्ष श्री. प्रफुल्ल तुम्मे, नागेश इटेकर, राहुल चव्हाण, सुनील चव्हाण, मुकेश मेहता, महेश ठाकरे, स्वप्निल रामटेके, कूकु सोनई, निखिल बजाईत, मोहब्बत खान, नदीम शेख, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.