पोंभुर्णा तालुक्यातील खरमत मार्गावरील घटना.
पोंभुर्णा:- खरमत मार्गे निखितवाळा येथे जात असताना दुचाकिचे नियंत्रण बिघडल्याने दुचाकी रोडच्या कडेला जाऊन पडल्याने दुचाकिस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री च्या सुमारास घडली. मृतकाचे नाव राजु सिडाम वय अंदाजे ४० वर्षे असुन तो आपल्या सासुरवाडी ला जात असल्याचे कडते. आज सकाळीं काही युवक फिरायला गेले असल्याने त्यांना सदर मृतक पडुन असल्याचे दिसले.याची माहिती पोंभुर्णा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. असुन पुढिल तपास सुरू आहे.