महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्य दि.१ जानेवारी रोजी निराधार व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. 

            रस्त्यांच्या कडेला झोपणा-या निराधार व्यक्तींना एक मदतीचा हात म्हणून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेचे अध्यक्ष शंकर बोरघरे, सरचिटणीस अब्बास अजानी, मार्गदर्शक तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे, सदस्यगण ईश्वर शर्मा, सुनील दैदावार, पवन शिवणकर, दीपक आसुटकर उपस्थित होते.