वडगाव येथे गोदरु पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न.
कोरपना:- तालुक्यातील वडगाव येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोदरु पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. गोदरु पाटील जुमानके हे संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व त्यांच्या संघर्षमय कार्याचा बोध घ्यावा असे प्रतिपादन कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ममताजी जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला भीमराव पाटील जुमनाके, प्रा. प्रकाशजी वेट्टी, मूलनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मन मंगाम, संजय सोयाम, मेजर बंडूजी कुमरे, आदिवासी विद्यार्थी संघ जिल्हाध्यक्ष कंठू कोटनाके, सरपंच मोहपतराव मडावी आणि वडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन गोंडवाना गणतंत्र पार्टी वडगाव येथील कार्यकर्त्यांनी केले.