पेनवासी गोदरू पाटिल जुमनाके यांना श्रध्दांजली अर्पण.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- चुनाळा-विरूर स्टे.जि.प. क्षेत्रातील चुनाळा (माणिकगड) येथे आज दि.१ जानेवारी,२०२१ रोजी या क्षेत्राचे जि.प.सदस्य तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष तिरू. गोदरू पाटिल जुमनाके यांना श्रध्दांजली अर्पण कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चुनाळा गाव चे सुपुत्र तथा राजुरा वि.स. क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर होते. 
    
      प्रमुख उपस्थिती गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापुराव पाटील मडावी, गोंडवानाचे कोयाभुमका मुकूंदाजी कुमरे, बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे, श्रमिक एल्गार चे घनश्याम मेश्राम, कवडूजी टेकाम, महादेव उईके, सचिन कांबळे, सुमित कोडापे, कलावती कोडापे, दशरथ कोडापे उषा करमनकर, दिनकर कोडापे,अर्चना विनोद आत्राम यांची होती.
  या वेळी मान्यवरांनी गोदरू पाटिल जुमनाके यांच्या कार्याचा उल्लेख करणारे मनोगत व्यक्त केले. या वेळी सगा समाज बांधव व ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.