घुग्गुस काँगेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या विरुद्ध प्रचंड रोष.
Bhairav Diwase. Jan 01, 2021
चंद्रपूर:- गुरुवारला घुग्गुसला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची घोषणा पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवर यांनी चंद्रपूर विश्राम गृहात केली केली.
परंतु घुग्गुस नगरपरिषदेचे श्रेय लाटण्यासाठी एका वर्तमान पत्रात राजू रेड्डी यांच्या प्रयत्नाचे फलीत असे वृत्त प्रकाशित आज दिनांक 1/1/2021ला प्रकाशित झाले हे वृत्त प्रकाशित होताच घुग्गुस सर्वपक्षीय नगरपरिषद स्थापना समितीच्या नेत्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी आपल्याच काँग्रेस कार्यालयात समोर घुग्गुस नगर परिषदेचा आनंदउत्सव साजरा केले. त्यामुळे घुग्गुस नगरपरिषद स्थापना समितीचे नेते संतप्त झाले.
त्यामुळं लगेच सर्व पक्षीय नेते घुग्गुस ग्रामपंचायत कार्यालयात गोळा झाले त्यांनी तिथे सर्वपक्षीय नगरपरिषद स्थापना समिती लिहिलेला केक कापला व ग्रामपंचायत कार्यालयातून रॅली काढली गांधी चौकात फटाके फोडून नगरपरिषद आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची गद्दार नेत्याचा निषेध असो अशी नरेबाजी केली ही रॅली जुना बसस्थानक मार्गे नवीन बस स्थानक चौकात धडकली तिथे फाटक्यांची आतिषबाजी करीत जोरदार नरेबाजी केली.
चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन घुग्गुस नगरपरिषदेचे श्रेय कोणा एका पक्षाचे नाही किंवा कोणा एका नेत्याचे नसून घुग्गुस सर्वपक्षीय नगरपरिषद स्थापना समितीचे आहे असे सांगितले व घुग्गुस काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी घुग्गुस नगरपरिषदेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असे आरोप पत्रकार परिषदेतून केला आहे.