नकोडा येथे वाघाचे दर्शन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 02, 2021
चंद्रपूर:- घुग्गुस येथून जवळच असलेल्या नकोडा गावात वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे नकोडा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दुपारी नकोडा गावातील वसाहती जवळ वाघाचे पंजे दिसले त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच नकोडा माजी उपसरपंच यांनी घटना स्थळ गाठले व वनविभागास माहिती दिली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळा जवळ शोध मोहीम राबविली असता वाघाचा पत्ता लागला नाही.


काही वर्षा पूर्वी नकोडा गावाच्या वसाहतीच्या जवळ वाघाने बकऱ्या फस्त केल्या होत्या तर तेलगू जि. प शाळे जवळील प्रांगणात वाघाचे दर्शन झालेअसता विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.